आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल घरफोड्याला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या:तब्बल 42 तोळे सोने, 4 किलो चांदी, 2 पिस्तुलांसह 24 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात एक, दोन नव्हे तर तब्बल 14 घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या एका सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 42 तोळे सोने, 4 किलो चांदी, 2 पिस्तुलांसह 24 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

राजेश ऊर्फ चोर राजा राम पपुल (वय 38, रा. सच्चाई माता मंदीर, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाकडून शहरातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू होता. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात घरफोडी करणारा राजेश पपुल उर्फ चोर राजा हा कात्रज येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. झाली. त्यानुसार युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. त्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी वेषांतर करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

तपास करणाऱ्या पथकाने "चोर राजा" या नावाने व्हॉटसअ‌ॅप ग्रुप तयार करुन त्याद्वारे सर्वांना संपर्कात घेतले. दरम्यान, एक महिन्याच्या कसून तपासानंतर दोन दिवसांपूर्वी पुपल हा पथकाला दिसताच त्याचा पाठलाग करून त्यास बेड्या ठोकल्या. त्याच्या 42 तोळे सोने. 4 किलो चांदी, 2 पिस्तुलांसह 24 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीविरुद्ध डेक्कन, बंडगार्डन, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, सिंहगड रोड, वारजे माळवाडी, हडपसर, कोंढवा पोलिस ठाणे या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, पोलिस कर्मचारी गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, कादीर शेख, संजय जाधव, उत्तम तारु, समीर पटेल, निखील जाधव, शंकर नेवसे, मोहसिन शेख, गणेश थोरात, नागनाथ राख, साधणा ताम्हाणे, रेश्मा उकरंडे यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...