आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यातील शिंदवणे येथे एका 70 वर्षीय महिलेच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून 3 लाख 41 किंमतीचे सोने व 20 हजारांची रोक रक्कम असा एकूण 3 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याबाबत पुढील तपास लोणीकाळभोर पोलिस करत आहे
बाणेर परिसरात पॅन कार्ड क्लब रस्त्यावर समर्थ कॉलनीत राहणाऱ्या हेमंत खटावकर (वय-59) यांच्या घरातील ग्रीलवरून कोणीतरी अज्ञात आरोपी 11 नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा ते सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान गॅलरीतून चढून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने, दोन मोपेड, दोन मोबाईल फोन व इतर वस्तू असा दोन लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन नेला आहे.
विशेष बाब म्हणजे खटावकर हे चोरी होताना राहते घरात झोपले असताना, चोरट्यांनी घरात चोरी करण्यासाठी त्यांच्या घरातून दुचाकीच्या चाव्या घेऊन पार्किगं मध्ये पार्क केलेल्या दाेन दुचाकी चाेरून घेवून गेल्याची घटना घडल्याची माहिती चतुश्रृंगी पोलिसांनी शनिवारी दिली आहे.
एटीएममध्ये फसवणूक
हडपसर परिसरात राहणारे एक 66 वर्षीय ससम हे मगरपट्टा चौकात कांचन गंगा अर्पाटमेंट मधील एटीएम मध्ये 8 व 9 नोव्हेंबर रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएम मधून पैसे निघाले नाही म्हणून त्यांचे मागे उभा असलेल्या अनोळखी इसमाने पैसे निघत नसेल तर दुसऱ्या एटीएमला जाऊन पैसे काढा सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या एटीएम मधून ते पैसे काढण्याचा प्रयत्न करुन ही पैसे बाहेर आले नाही. त्यावेळी त्यांचे शेजारी उभा असणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने तुमच्याकडून काहीतरी चुक झाली असेल असे बोलण्याच्या बहाण्याने करुन हातचलाखी करुन त्यांचे एटीएमकार्ड न देता दुसरेच एटीएम कार्ड तक्रारदार यांना देऊन त्यांचे एटीएम कार्डचा वापर करुन परस्पर एक लाख दोन हजार रुपये रक्कम इतर ठिकाणावरुन काढून फसवणुक केल्याने अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी शनिवारी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.