आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच:चोरट्यांनी 3 घरात केली चोरी, सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास; संशयितावर गुन्हा दाखल

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचे सत्र सुरूच असून, विविध भागातील बंद फ्लॅट चोरट्यांच्या निशाण्यावर येत आहे. हडपसर, लोणीकंद व फरासखाना परिसरातील तीन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सव्वा पाच लाखांवर डल्ला मारला. तसेच बुधवार पेठेतील दुकान चोरट्यांनी फोडले. अशी माहिती पोलिसांनी गुरवारी (04 ऑगस्ट) दिली.

गुन्हा दाखल

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात कृष्णा लिंगय्या आंबेती (वय 55, रा.पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी साडे बारा ते रात्री साडे नऊ या वेळेत घडला आहे. तक्रारदार हे ससाणे नगरमधील चेतन हाईट्स या इमारतीत राहतात. ते मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांचे घरफोडून 4 लाख 42 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

काय आहे घटना?

रात्री साडे नऊच्या सुमारास ते परत आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीसांना या घटनेची माहिती दिली. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बुधवार पेठेतील इलेक्ट्रीकल्सचे दुकान फोडून 60 हजार रुपयांचे केबल चोरून नेले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात शंतनू पवार (वय 36) यांनी तक्रार दिली आहे. बुधवार पेठेतील सावतामाळी भवन येथे पवार यांचे गुरूप्रसाद असोसिएट्स नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी ते बंद असताना फोडून त्यातून 60 हजार रुपयांचे कॉपरचे वायर चोरून नेले. तिसरी घटना लोणीकंद परिसरात घडली आहे. चोरट्यांनी बंद घरातून 17 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी प्रफुल्ल घडवे (वय 30) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, लोणीकंद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी नऊ ते रात्री साडे आकरा यावेळेत घडली आहे.

बातम्या आणखी आहेत...