आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवले 54 हजार रुपये

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवासी असल्याचा बहाणा करून चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर चालकाच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना पुण्यातील पद्ममावती भागात घडली. याबाबत रिक्षाचालक अशोक बाबुराव सोनवणे (वय ६५, रा. गणेश चेंबर, धनकवडी,पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे स्टेशन परिसरात चोरट्यांनी प्रवासी असल्याचा बहाणा करुन रिक्षाचालक सोनवणे यांना रिक्षा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे नेण्यास सांगितले. चोरट्यांनी दर्शन घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर चोरट्यांनी रिक्षाचालक सोनवणे यांना प्रसादातून गुंगीचे औषध दिले. रिक्षा पद्ममावती येथे नेण्यास सांगितले. प्रसादातून गुंगीचे औषध दिल्यानंतर रिक्षाचालक सोनवणे यांना गुंगी आली. सोनवणे यांनी रिक्षा पद्ममावती परिसरात थांबविली. ते बेशुद्ध पडल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविली. काही वेळानंतर सोनवणे शुद्धीवर आले.

जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालकाला लुटले
शहरातील मध्यवर्ती जंगली महाराज रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी मोटारचालकाला धमकावून त्याच्याकडील पाच हजारांची रोकड लुटून नेली. ही घटना २९ एप्रिलला घडली असून नील जैन (वय २५, रा. घोरपडी,पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारचालक जैन जंगली महाराज रस्त्यावरुन जात असताना दुचाकीस्वार वेडीवाकडी दुचाकी चालवित होता. त्यामुळे जैन यांनी त्याला जाब विचारला. त्यानंतर दुचाकीस्वाराने काही अंतरावर मोटार अडवून जैन यांना धमकावले. मारहाण करुन मोटारीत ठेवलेली पाच हजारांची रोकड लुटून नेली.

बातम्या आणखी आहेत...