आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:विचारवंत, माजी आमदार डॉ. मंगुडकर यांचे निधन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ लेखक, विचारवंत तथा विधान परिषदेचे माजी आमदार डॉ. माणिक पद्मण्णा उर्फ मा. प. मंगुडकर (९४) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेली काही वर्षे ते छत्रपती संभाजीगनरमधील वैजापूर येथे कन्या डॉ. लीना अन्नदाते यांच्याकडे वास्तव्यास होते. डॉ. मंगुडकर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांनी पुण्यातच फर्ग्युसन महाविद्यालय व वाडिया महाविद्यालयात अध्यापन केले. शाहू महाविद्यालय आणि संघवी केसरी महाविद्यालयात त्यांनी प्राचार्यपदी कार्य केले होते. बार्शी येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून १९६६ ते १९७८ या काळात ते विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त होते.