आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:कार्टून पाहू न दिल्याने तेरा वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओढणीच्या सहायाने गळफास घेत संपवले जीवन

कार्टून पाहू न दिल्याने एका तेरा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी येथे घडला. याप्रकरणी पोलिस  ठाण्यात आत्महत्या केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  मंगळवारी दुपारी दीड ते दाेन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याने अाेढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  

दाखल फिर्यादीनुसार, त्याने नुकताच सातवीच्या वर्गात प्रवेश केला होता. मंगळवारी सकाळ पासूनच मुलगा कार्टून पाहत होता. त्याच्या घरच्यांनी त्याला अनेकवेळा सांगूनही त्याने घरच्यांचे ऐकले नाही. शेवटी टीव्ही बंद करून घरातले बाहेर गेले असताना त्याने अाेढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला तात्काळ जवळच्या भारती हाॅस्पिटल या रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित करून त्याला ससून रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यास सांगितले. त्याच्या कुटुंबियांनी मुलाचा मृतदेह थेट घरी नेल्याची बाब पाेलीसांना समजली अाणि त्यांनी सदर कुटुंबाचे घरी जाऊन मुलाचे शवविच्छेदन करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पालकांचे ताब्यात देण्यात अाला. सदर मुलाचे वडील खेडशिवापूर येथे राहत असून काैटुंबिक वादातून पत्नी  व मुलगा पुण्यातील बिबवेवाडी येथे  वेगळे राहत हाेते.  अल्पवयीन मुलाने किरकाेळ कारणावरुन अात्महत्या  केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...