आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसचा टँकर उलटून तीन जण ठार:मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटून तीन जण ठार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर साेमवारी सकाळी सव्वाअकरा वाजता खंडाळा घाटातील खाेपाेली एक्झिटजवळ तीव्र उतारावर गॅसचा टँकर उलटून तीन जण ठार, तर ४ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर जनार्दन देशपांडे (३०, रा. निगडी, पुणे), योगेश धर्मादेव सिंग (३२, रा. चिखली, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. मृत कारचालकाची ओळख पटवण्यात येत आहे. या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे खोपोली पोलिसांनी सांगितले.

अपघातग्रस्त गॅस टँकर हा साेमवारी सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. टँकर खाेपाेली एक्झिटजवळ टँकरचालकाचे तीव्र उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर उलटला. या वेळी टँकरला भरधाव असलेल्या कारसह आणखी एक कार पाठीमागून धडकली. या अपघातात कारमधील चालकासह तिघे ठार झाले. या अपघातामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ४ तास विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या.

बातम्या आणखी आहेत...