आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोंढवा परिसरात एका ठिकाणी बांधकाम चालू ठेवण्यासाठी रोख 30 लाखांची खंडणी मागणी करून टु बीएचकेची मागणी करत आम्ही कोणाला ही घाबरत नसल्याचे म्हणत जबरदस्तीने खंडणीची मागणी करणार्या तिघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
समीर पठाण, शफी पठाण आणि साजिद (सर्व रा. परगेनगर, कोंढवा खुर्द,पुणे) या आरोपीवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुस्तफा इमामसहाब शेख (30, रा. गल्ली नंबर 9, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द,पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सदरचा प्रकार जानेवारी 2022 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढवा खुर्द येथील पोकळे मळा येथील एका ठिकाणी 7 गुंठ्यांपैकी 4 गुंठ्यांवर जॉईंट व्हेंचरमध्ये बांधकाम करीत असताना आरोपी यांनी शेख यांना बांधकाम चालु ठेवण्यासाठी 30 लाख रुपये रोख मागितले. तडजोडीअंती रोख स्वरूपात 15 लाख शफी पठाण याला तर एक टु बीएचके एका मस्जिदच्या नावे तसेच समीर पठाण याला १० लाख रूपये रोख अशी मागणी आरोपींनी केली. तक्रारदार शेख यांनी त्यांच्या मागणीला विरोध केल्याने त्यांनी शेख यांचे बांधकाम बंद करून आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही येथील स्थानिक असून येथे फक्त आमचेच चालते अशी धमकी देवुन जबरदस्तीने पैशाची मागणी केली म्हणून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.