आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्करी:हैद्राबाद येथून राज्यात गांजाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैद्राबाद येथून महाराष्ट्रात गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी करणाऱ्या तिघांना सिमा शुल्क (कस्टम) विभागाने पाठलाग करून अटक केली. त्यांच्याकडून ५६ किलो गांजा जप्त करण्यात आला.

हैद्राबाद येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी होणार असल्याची मागणी कस्टम विभागाला मिळाल्यानंतर पुण्याहून विभागाचे एक पथक सोलापूरच्या दिशेने रवाना झाले. यावेळी हैद्राबाद येथून येणाऱ्या राज्य परिवहन बसचा पाठलाग करून अडवण्यात आली. बसमधील तीन जणांकडे यावेळी तब्बल ५६ किलो गांजा सापडला. त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आल्याची माहिती कस्टमचे उपायुक्त सचिन घागरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...