आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:येरवडा कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या तीन कैद्यांचा आजारांनी मृत्यू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येरवडा कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या ३ कैद्यांचा मृत्यू झाला. कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजारपणातून झाल्याचे कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी येरवडा कारागृहात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. संदेश अनिल गोंडेकर (२६, रा. डोणजे, हवेली), शाहरुख बाबू शेख (वय २९, रा. कोंढवा), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (३२, रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. तिन्ही कैद्यांना विविध प्रकारचे आजार होते. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती येरवडा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली .

बातम्या आणखी आहेत...