आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार थेट उत्पादकांकडून घरबसल्या हापूसच्या खरेदीची सोय

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आंब्याची देवघेव उत्पादक आणि ग्राहक या दुहेरी पद्धतीने ऑनलाइनमार्गे करता येणार

जयश्री बोकील

आंब्याचा हंगाम आता सुरू झाला असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही ग्राहकांपर्यंत फळांचा राजा पोहोचण्याचा मार्ग कृषी पणन मंडळाने उपलब्ध केला आहे. आंब्याची ही देवघेव उत्पादक व ग्राहक अशा दुहेरी पद्धतीने ऑनलाइनमार्गे करता येईल.

कोकणातील उत्पादकांद्वारे हापूस आंबा शहरातील ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ दरवर्षी आंबा महोत्सव घेते. तथापि, यंदा कोरोनाच्या प्रकोपामुळे महोत्सवाचे आयोजन अशक्य आहे. उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये तसेच शहरातील ग्राहकांनाही घराबाहेर किंवा सोसायटीबाहेर पडावे लागू नये याकरिता उत्पादक ते ग्राहक या दोघांनीही ऑनलाइन पोर्टलद्वारे आंबा खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावरील Buyer Seller Information लिंकद्वारे अथवा bs.msamb.com या लिंकद्वारे खरेदीदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

पोर्टलवर ही सुविधा...

या पोर्टलवर देवगड व रत्नागिरी हापूस आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू आहे. आंबा उत्पादकांचे नाव, संपर्क क्रमांक, कोणत्या प्रजातीचा आंबा उपलब्ध आहे इ. तपशील उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे, मुंबई तसेच इतर शहरातील वैयक्तिक ग्राहक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्था इत्यादी सर्वांना त्याची मागणी नोंदवता येईल.

खरेदीसाठी किमान मर्यादा १०० डझन

गुलटेकडी येथील वखार महामंडळाचे गोदाम तात्पुरते साठवणुकीची व्यवस्था म्हणून उपलब्ध केले आहे. आंबा खरेदीकरिता किमान मर्यादा १०० डझन असणार आहे. तसेच आंबा थेट सोसायटीमध्ये पोहोचवता यावा यासाठी वाहन व्यवस्थादेखील उपलब्ध आहे. या सुविधेसाठी ग्राहकांनी कृषी पणन मंडळाच्या पोर्टलवरील माहितीद्वारे खरेदीदार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपली मागणी एकत्रित नोंदवावी अथवा आंबा उत्पादकांशी संपर्क करून खरेदीसाठी मागणी नोंदवावी, असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...