आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बेरोजगार तरुणाची आत्महत्या:चिठ्ठीत लिहिले- माझा मृतदेह खड्ड्यात फेका, दुःखी होण्यासाठी कुणीच नाही

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्यूनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कुणीच नाही, असा मजकूर लिहून एकाने केजुदेवी बंधाऱ्यात आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी थेरगाव येथे उघडकीस आला आहे.

सुरेशकुमार (२५, रा. केरळ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून यामध्ये “मी शहरात नोकरीच्या शोधात आलो होतो. मात्र, मला काम मिळाले नाही. माझ्या खिशात पैसे आणि खाण्यासाठी अन्न नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्यूनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कुणीच नाही,’ असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू
पुणे पोलिसांनी संबधित तरुणाने लिहलेली चिट्ठी जप्त केली आहे. मात्र, ही चिठ्ठी सुरेश यानेच लिहिली आहे का?, तसेच, यामागे काही घातपात आहे का? याबाबत वाकड पोलिस तपास करत आहेत. तसेच सुरेश हा कुठे कामाला होता का? याबाबतही आता तपास करण्यात येत आहे. एकूणच या प्रकरणाचा गूढ हे वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...