आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गीताली टिळक

पुणे|2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गीताली टिळक यांची पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली असून आज त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणे तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार निवड प्रक्रिया करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता, शैक्षणिक संशोधनातील महत्त्वाचे योगदान आणि नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभारी कुलगुरू या नात्याने टिळक महाराष्ट्र विद्यापीठात केलेली प्रभावी अंमलबजावणी अशा निकषांवर कुलगुरुपदावर डॉ. गीताली टिळक यांची पाच वर्षांकरिता िनवड झाली.