आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:प्रियकराच्या जाचाला कंटाळून नर्स तरुणीची विषारी ओैषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या; गुन्हा दाखल

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सने विषारी ओैषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत प्रियकराने मोटार घेण्यासाठी नर्स तरुणीकडे पैशांची मागणी तसेच मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अश्विनी देवीदास राठोड (वय -21, रा. धानोरी,पुणे) असे आत्महत्या केलेल्या नर्स तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर बापू किसन मैद (वय- 22, रा. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनीचे वडील देवीदास राठोड (वय- 54, रा. चिखलठाणा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किसन मैद आणि अश्विनी राठोड यांनी कन्नड येथील एका संस्थेतून नर्स अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघे जण पुण्यात नोकरीसाठी आले. अश्विनी लोहगाव भागातील एका खासगी रुग्णालयात नर्स होती. किसनने तिच्याकडे नवीन दुचाकी घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. अश्विनीने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो तिला शिवीगाळ करुन त्रास देता.

किसनच्या त्रासामुळे अश्विनीने विषारी ओैषधांची इंजेक्शन टोचून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अश्विनीचा प्रियकर किसन याच्या त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याचे वडील देवीदास राठोड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एस साळवी पुढील तपास करत आहेत.