आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे मनपा विरोधात आंदोलन:महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करणार; आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा वेळेवर पगार होत नाही व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता होत नसल्याबाबत मंगळवारी महानगरपालिकेच्या प्रवेश द्वारावर, राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी तातडीने संघटनेचे पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली. यामध्ये त्यांनी सांगितले पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांमध्ये नियुक्ती केली आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांचे प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ऑनलाइन पोर्टल करण्याबाबतच्या सूचना अतिरिक्त आयुक्त यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

ही सर्व यंत्रणा उभी राहण्यासाठी थोडा कालावधी जाईल. परंतु त्यानंतर मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारा पगार कंत्राटदाराने कोणत्या तारखेला पगार दिला, कंत्राट दाराने करावयाचे पी एफ, ई एस आय सी व इतर प्रतिपूर्ती केली आहे किंवा कसे, हे सर्व या ऑनलाईन पोर्टर वर दिसेल व त्यावर त्याक्षणी तातडीने निर्णय घेणे, कारवाई करणे शक्य होईल, असे सांगितले. ज्या कंत्राटी कामगारांना विनाकारण कामावरून काढण्यात आले आहे, त्यांची यादी संघटनेने सादर करावी, त्यांना न्याय देण्यात येईल असे सांगितले.

पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या इतर सर्व प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी पुणे महापालिकेतील कंत्राटदार, संबंधित अधिकारी व राष्ट्रीय मजदूर संघाचे पदाधिकारी यांची बैठक 24 जून नंतर घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. राष्ट्रीय मजदूर संघातर्फे संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी कंत्राटी कामगारांचे विविध प्रश्न आयुक्तांसमोर मांडले. यावेळी शिष्टमंडळात मध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी सखाराम पळसे, कामगार प्रतिनिधी विजय पांडव, जानवी दिघे, स्वप्निल कामठे, उमेश कोडीतकर, रमेश भोसले, अरविंद आगम यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...