आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:पुण्‍यात आज मनसेचा वर्धापन दिन; राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष, पुणे मनपासाठी राज ठाकरे स्‍व:त मैदानात

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे मनसैनिकांना आज सायंकाळी 6 वाजता संबोधित करणार आहेत. राज ठाकरे काय बोलणार याकडं महाराष्‍ट्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी मनपा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी स्व:त जातीने लक्ष घातले आहे. यासाठी मागील काही महिन्यांपासून त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागाचे दौरे सुरु केले आहेत; तर महापालिकांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू केलीय.

पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. मुंबई बाहेर पहिल्‍यांदा मनसेचा वर्धापन दिन सोहळा असल्‍याने राज ठाकरे आता पुण्‍यावर आपलं लक्ष केंद्रीत करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्व:त येथे उपस्थित राहत राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून राज्यभरातील कार्यकर्ते पुण्‍यात दाखल झाले आहेत. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष या वर्धापन दिनाकडे लागले आहे. राज ठाकरे आज नेमके काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर मनसेचा वर्धापन दिन पुण्यात नाही ना, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

राजगर्जना’ होणार की केवळ मनपाची तयारी

सध्‍या राज्‍यात सुरू असलेल्‍या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर राज ठाकरे काय भाष्य करणार. याबरोबरच मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत मनसेची भूमिका स्पष्ट करणार आहेत का ? असा प्रश्‍न अनेकांना पडलाय केवळ मनपाची तयारी म्‍हणून राज ठाकरे पनुण्‍यात आले नसावे ना; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी नाशिका महापालिकेतील सत्ता मिळाली होती. आता मनसेनं राज्यातील मनपा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यात प्रामुख्‍याने मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळे पुण्यात होणारा मनसेचा वर्धापन दिन किती प्रभावी ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...