आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज दहावी परीक्षेचा निकाल:दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार, या संकेतस्थळांवर निकाल पाहता येतील

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाने दिली. हे निकाल www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in या संकेतस्थळांवर पाहता येतील.

सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...