आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Toll Exemption For The Chief Minister's Meeting, Why Not The Farmers? The Question Of The Office Bearers Of Swabhimani Shektar Sangathan

मुख्यमंत्र्यांच्या सभेला टोलमाफी,शेतकऱ्यांना का नाही?:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा संतप्त सवाल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना अदा करण्याच्या दोन तुकड्यातील एफ.आर.पी.चा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एफ. आर. पी. एकरकमी करा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दुपारी साखर संकुल पुणे येथे राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चासाठी कोल्हापूरहून पुण्याकडे येत असलेली शेतकऱ्यांची वाहने सातारा येथील आनेवाडी टोल नाक्यावर सकाळी अडवल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

टोल नाक्यावर गोंधळ

या प्रकाराने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आनेवाडी टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने गोंधळ उडाला आहे. आनेवाडी टोल नाक्यावर शेतकर्यांच्या गाड्या सोडण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यावर कार्यकर्त्यांनी टोल नाके बंद पाडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मेळाव्यास टोल माफी दिले जाते परंतु शेतकर्यांना टोल माफी का दिली जात नाही असे म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाल्याने आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड गोंधळ सुरू झाला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका टॉकीज चौक ते शिवाजीनगर परिसरातील साखर संकुल यादरम्यान राज्यव्यापी धडक मोर्चाचे आंदोलन करण्यात आले आहे.

काय आहेत मागण्या

या धडक मोर्चातील प्रमुख मागण्या आहेत की, दोन तुकड्यातील एफ.आर.पी.चा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एकरकमी करावा. काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करा. मागील वर्षाची एफ. आर. पी + 200 रूपये तातडीने द्या. सर्व ऊस तोडणी कामगार तोडणी महामंडळामार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत. गतवर्षीच्या सरासरी रिकव्हरीस आधारित चालू हंगामात एक रक्कमी एफ.आरपी व हंगाम संपल्यानंतर 350 रूपये उचल द्या.तोडणी मशिनने तुटलेल्या उसाला पालापाचोळ्याची कपात 4.50 टक्याऐवजी 1.50 टक्के करा.राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना या मोर्चात समविष्ट होण्याची साद घालण्यात आली आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता हा मोर्चा अलका टाकीज ते साखर संकुल पुणे येथे जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...