आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवाच्या दीर्घ आयुष्यासाठी योगाचे काय महत्त्व आहे हे अधाेरेखित करण्यासाठी २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जाताे. या वर्षीच्या जागतिक योग दिनाची थीम मानवतेसाठी योग अशी आहे. या अनुषंगाने योगाचा प्रचार व प्रसार वाढवून योगमय वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच आरोग्य सुदृढ कसे राखता येईल याची पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभरातील पर्यटक निवासांमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येत असलेल्या सर्व पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या पर्यटकांना एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच पर्यटक निवासात कार्यरत प्रत्येक कर्मचारी वर्गाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून यंदा राज्यभरातील पर्यटक निवासाच्या ठिकाणी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. योगसाधना करून ‘योग दिवस’ साजरा केला जाईल.
असे उपक्रम राबवणार
पर्यटक निवास परिसरातील योग प्रशिक्षण संस्थेस किंवा व्यक्तींना पर्यटक निवासात बोलावून योगाचे महत्त्व, योगाचे प्रकार, योगामुळे शरीरास होणारे फायदे व्याख्यानाद्वारे सांगणे, आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे योगाभ्यास केला पाहिजे असे आवाहन केले जाणार आहे.
योग माणसांना जाेडून सद्भावना निर्माण करताे
^या वर्षाची संकल्पना मानवतेसाठी योग अशी आहे. योग माणसांना जोडून परस्पर प्रेम आणि सद्भावना विकसित करतो. त्यामुळे पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या विविध धर्मांचे लोक आणि देशप्रेमाच्या भावनेने प्रेम, सद्भावना आणि आत्मीयतेने योगा करण्यास मार्गदर्शन करण्यात येईल. त्या अनुषंगाने सर्वच पर्यटक निवासांमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यास सांगितले आहे.
- जयश्री भोज, व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.