आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदैवाने जीवितहानी नाही:पुण्यात भवानी पेठेत इलेक्ट्रीकचे काम करताना ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भवानी पेठेत रविवारी सायंकाळी अचानक स्फोटाचा अवाज झाल्याने पोलिसांची धांदल उडाली. समर्थ पोलिस, गुन्हे शाखेचे पोलिस, तसेच इतर तपास यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट झाल्याचे तपासनंतर दिसून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत व्यक्ती वॉशिंगमशीन दुरूस्तीचे काम करत असताना ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. यावेळी खिडकीच्या काचा फुटल्या. मात्र या अपघातात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली त्यावेळी वॉशिंगमशीनेचे काम करताना हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. यावेळी वरिष्ठ अधिकार्‍यांसह विविध पथकांच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पाहणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारे घातपाताचे किंवा संशयास्पद कृत्य आढळले नसल्याचे समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...