आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील कसबा पेठ व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी १०,९५० च्या मताधिक्याने, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ३६ हजारांवर जास्त मते घेऊन विजय मिळवला. २०१९ मध्ये या दोन्ही जागांवर अनुक्रमे मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार विजयी झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त जागांवर २६ फेब्रुवारीला मतदान झाले होते.
कसब्यात १९९१ चा अपवाद वगळता आजवर ब्राह्मण समाजाचा आमदार निवडून आलेला आहेे. भाजप नेते गिरीश बापटांनी सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या वेळी मात्र महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असल्यामुळे भाजपने ब्राह्मण उमेदवाराची ‘परंपरा’ खंडित केली व स्थायी समितीचे चार वेळचे सभापती हेमंत रासने यांना तिकीट दिले. यामुळे ब्राह्मणांनी मतपेटीतून तीव्र नाराजी व्यक्त केली. टिळक कुटुंबाला डावलल्याचाही राग होता. परिणामी २८ वर्षांपासून ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपला गमवावा लागला. चिंचवडची जागा मात्र भाजपने सहानुभूतीवर राखली.
विजयानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी टिळक वाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे दर्शन घेतले. नूतन आमदार अश्विनी जगताप यांना दिवंगत पती लक्ष्मण जगताप यांच्या समाधीचे दर्शन घेताना अश्रू अनावर झाले होते.
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा शिंदे-फडणवीसांचा पराभव. सामान्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांनीच पराभव केला. पुण्यात नियमानुसार प्रचार झाला असता तर आघाडीने दोन्ही जागा जिंकल्या असत्या.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडकरांचे आभार. कसब्यातील जनतेचेसुद्धा आभार. तेथे थोडे कमी आशीर्वाद मिळाले, पण आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.