आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा कोरोना निर्बंध उठवल्याने आषाढी वारीमध्ये उत्साही वातावरण आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरीच्या वाटेवर पायी चालून सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला जाण्यासाठी वैष्णवजण आतुर झाले आहेत. संत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून 20 जूनला होणार आहे. त्यानंतर 21 जूनला माऊलींची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये वाहतुकीचे बदल करण्यात आले आहेत.
संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे 337 वे वर्ष आहे. टाळ-मृदंगाचा गजरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाकऱ्यांच्या दिंड्या सध्या आळंदी आणि देहू दाखल झाल्या आहेत. परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. यंदा मोठ्या उत्साहात आषाढी यात्रा पार पडण्याची शक्यता आहे. वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर, पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
येथे असेल मुक्काम
यंदा 20 जून रोजी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूकडे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असेल. आषाढी एकादशीला म्हणजे 10 जुलै रोजी तुकोबांची पालखी पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा घालेल. तर संत ज्ञानेश्वरांची पालखी लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.