आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांसाठी स्मार्ट वाहने:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द; पुण्यात मदत, तपास अन् टेहळणी होणार सुसाट

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी - चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता 50 स्मार्ट दुचाकीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले. शहरामधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी व चोऱ्या यांचे पोलिस पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरिता या वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस विभागाला कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी या दुचाकी वाहनांची मदत होणार आहे.

स्मार्ट बाईक मोटार सायकल्सचे हस्तांतरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट बाईक मोटार सायकल्स हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकराणाचे वाटप तसेच अग्निशमन दुचाकी वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

ईमरजन्सी ठिकाणी मदत

पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरुद रस्ते, गल्लीबोळ, मार्केट परिसर, इत्यादी ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशामक जवानास तातडीने व सहजपणे पोहचण्यास या वाहनांमुळे मदत होणार आहे. या वाहनात 20+20 लीटर क्षमतेच्या 2 पाण्याच्या टाक्या आहेत. घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्यासाठीदेखील वाहनांची मदत होणार आहे. यावेळी ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकरणचे वितरण करण्यात आले. हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती, डिजिटल पेमेंट, वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे.

सामाजिक उत्तरदायित्व कक्ष

शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूहाद्वारे प्राप्त होणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून शहराच्या विकासात भर घालण्यासाठी समन्वय साधण्याचे कार्य या कक्षामार्फत करण्यात येईल.

महानगरपालिकेचे विविध उपक्रम

स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण प्रकल्पाद्वारे शहराचा शाश्वत विकासासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. महापालिकेचे विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कल्याणकारी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच उद्योग समूहाचा या कामात सहभाग वाढविण्याकरिता सामाजिक उत्तरदायित्व कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. कक्षाच्या माध्यमातून खाजगी संस्था तसेच महानगरपालिका यांना एकत्रित आणून नव्या योजना, कल्पना, कार्यक्रम इत्यादींची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...