आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Transfer Of Senior Police Officers In The State, Appointment Of Amitabh Gupta As Additional Director General Of Police, State Prisons

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या:अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अप्पर पोलिस महासंचालक पदी नेमणूक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहविभागाने राज्य पोलिस दलातील आणखी काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या शनिवारी केल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व मुंबईचे विशेष शाखेचे अप्पर आयुक्त रंजन कुमार शर्मा यांचा समावेश आहे. पुण्याचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विशेष महासंचालक पदी करण्यात आलेली नेमणूक रद्द करून राज्य कारागृह अपर पोलिस महासंचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर शर्मा यांची पुण्याच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचे अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली होती. तर सीआयडी प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची पुणे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर विनयकुमार चौबे यांनी पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर शनिवारी पुन्हा राज्याच्या गृह विभागाने बदलीचे आदेश काढले आहेत.

यात नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात अलायी आहे. तर मीरा भाईंदर वसई विरारचे पोलिस उप आयुक्त सुरेश कुमार मेंगडे यांची नेमणूक ही नवी मुंबई सिडको येथे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग रवींद्र शिसवे हे मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार आहेत. तर विशेष पोलिस महानिरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था यांची नवी मुंबई पोलिस सह आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...