आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखक - प्रकाशक संमेलनाचे सातारा येथे उदघाटन:अनुवादित साहित्य ही स्वतंत्र कलाकृती; रवींद्र गुर्जर यांचे प्रतिपादन

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुवादित साहित्याला आणि अनुवादकाला सर्वसाधारणपणे दुय्यम स्थान देण्याकडे कल असतो. परंतु मूळ कलाकृतीचा सशक्तपणे अनुवाद करणे ही एक कला आहे. माझ्या मते अनुवादीत साहित्य ही स्वतंत्र कलाकृती असते, असे मत तिसर्‍या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी शनिवारी व्यक्त केले.

उदयनराजेंच्या हस्ते उदघाटन

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे, लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्था सातारा, आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे आयोजित दोन दिवसीय तिसर्‍या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी गुर्जर बोलत होते. सातार्‍यातील शाहू कलामंदिर, राजवाडा चौक येथे होत असलेल्या या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक दत्तप्रसाद दाभोळकर, 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक अनिल मेहता, तिसर्‍या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस, तिसर्‍या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रंथदिंडी निघाली उत्साहात

संमेलनाच्या उद्घाटनाच्या आधी सकाळी संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र गुर्जर, हरीश पाटणे, शैलेंद्र पळणीटकर, राजेश सोळसकर, दीपक शिंदे, दीपक प्रभावळकर, श्रीकांत कात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी पार पडली. यामध्ये शहरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी पारंपारिक पोषाखात सहभागी झाले होते.

अनुवादाला मोठी परंपरा

अध्यक्ष रवींद्र गुर्जर म्हणाले की, अनुवादाला हजारो वर्षांची परंपरा आहे. आजही ग्रंथालयांमध्ये अनुवादित साहित्याला मागणी आहे. एखाद्या साहित्य कृतीचा अनुवाद करणे हा केवळ साहित्यिक उहापोह नसून या माध्यमातून अनुवादक एका नव्या संस्कृतीशी वाचकांना गाठभेट घालून देत असतो. एका अर्थाने वाचक अनुवादकांबाबत कृतज्ञता बाळगून असतो.

विचारांत व्यापकता हवी

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, विचारांमध्ये व्यापकता आणायची असल्यास पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय नाही. लेखक आणि वाचक यांच्यामधील प्रकाशक हा मुख्य दुवा असतो. प्रकाशकाचे काम कौतुकास्पद आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे म्हणाले की, संस्कृतीचा आढावा घेतला असता अनेकांनी ज्ञान केंद्रांवर हल्ले करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसून येते. नालंदा हे त्यातलेच एक उदाहरण म्हणू शकतो.

बातम्या आणखी आहेत...