आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भीषण अपघात:नवले पूल परिसरात ट्रक 48 वाहनांना धडकला; 20 जण जखमी, अपघातानंतर ट्रकचालक फरार

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर नवले पूल परिसरात वेगाने जात असलेल्या चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने ट्रकने ४८ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले. सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

आंध्र प्रदेशमधील मालवाहतूक करणारा एक ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले ब्रिज परिसरातील दरी पूल पार केल्यानंतर ट्रक नवले पुलाजवळील तीव्र उतारावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने समोरून येणाऱ्या कार आणि रिक्षा यांना धडक दिली. हा ट्रक ४०० ते ५०० फूट गेला. वाहनांना धडकून थांबल्यानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला.

वाहनांत अनेक चालक अडकून पडले पोलिसांनुसार अपघातग्रस्त वाहनांत अनेक चालक अडकून पडल्याने गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या व्हॅन तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ऑइल सांडल्याने रस्ता वाहतुकीस बंद ४८ वाहने अपघातग्रस्त झाली असून २० जण जखमी झाले आहेत. सहा जणांना दोन रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...