आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:टेम्पो व मोटारीला ट्रकची धडक; अपघातात 2 ठार, पुणे-सोलापूर मार्गावर घडला अपघात

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-सोलापूर मार्गावर मोटारीने अचानक ब्रेक दाबल्याने कलिंगडाच्या टेम्पोची धडक कारला बसली आणि यावेळी भरधाव येणाऱ्या सिमेंट ट्रकने या दोन्ही वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिमेंट ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत टेम्पोचालक ओमकार बापू पाळेकर व मोटार चालक सुनील भीमराव पवार असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मंगेश बंकट खोचरे, सर्फराज जहागीरदार हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी रोहित शंकर गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या शेतातून कलिंगड टेम्पोत भरून पुणे-सोलापूर मार्गाने बाजारपेठेत जात होते. यावेळी त्यांच्या टेम्पो समोर असणाऱ्या मोटार कारने अचानक ब्रेक दाबल्याने त्यांचा टेम्पो कारला धडकला. यावेळी टेम्पोचालक ओमकार पाळेकर तर कारचालक सुनील भीमराव पवार हे गाडीचे किती नुकसान झाले आहे, हे पाहण्यासाठी खाली उतरले होते. यावेळी मंगेश खोचरे आणि जाहागीरदार हे टेम्पोमध्ये बसले होते. तर फिर्यादी हे लघुशंकेसाठी बाजूला जात होते. यावेळी अचानक भरधाव येणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने टेम्पो आणि मोटारीला जोरदार धडक दिली.

बातम्या आणखी आहेत...