आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूरहुन देवीचे दर्शन करुन पुण्याल परतणाऱ्या भाविकांच्या खाजगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून 30 भाविक जखमी झाले आहेत. तर 2 ते 3 जण हे गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
60 भाविक असलेली खाजगी बस तुळजापूरहुन पुण्याकडे येत असताना दौंड तालुक्यातील मळद येथे भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील अर्ध्याहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र पुण्यातील महिला भाविकाचा यात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
भवानीपेठ, लोहिया नगरचे रहिवासी
नेमका हा अपघात कसा झाला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी बस ही पुणे-सोलापूर महामार्गावर असताना मळद येथील खड्डयात बस उलटली. या अपघातात 30 जण जखमी झाले. या जखमी प्रवाशांमध्ये वृद्ध, लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व प्रवासी हे पुण्यातील भवानीपेठ, लोहिया नगर परिसरातील राहणारे आहेत. हे सर्व जण देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर, येरमाळा याठिकाणी गेले होते.
खासगी रुग्णालयात उपचार
मालाड घागरेवस्तीजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर बस मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडच्या मधोमध असलेल्या कल्व्हर्टवर उलटली. जखमी प्रवाशांना दौंड व भिंगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.