आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नादच बेक्कार!:आयपीएल क्रिकेट सामन्यातील बेटिंगमुळे इंजिनिअर झाला चोर; पुण्यात विमानाने येऊन मारला डल्ला

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल क्रिकेट सामन्यातील बेटिंगमुळे हरियाणा येथील एक बीटेक इंजिनीअर चोर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्याने पुण्यात विमानाने येऊन चोरी केल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिसांनी उघड केला. त्याला त्याच्या हरियाणा येथील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या. ट्विनकल अर्जुन अरोरा (३०, बलभगड, जि. फरीदाबाद, हरियाणा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे, अशी माहिती परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी शुक्रवारी दिली.

कशी केली चोरी?

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी सांगितले की, १५ मे रोजी बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी हे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी राजयोग लॉन्स येथे त्यांची सुझकी सियाज कार ही घेवून आले होते. त्यावेळी कार पार्क करून ते दरवाजा लॉक न करता क्रिकेट खेळण्यासाठी गेले. त्यादरम्यान त्यांच्या गाडीतून सॅमसंग कंपनीचा टॅब, अ‌ॅक्सीस बँकेंचे दोन डेबिट कार्ड अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले. त्याने चोरलेल्या डेबिट कार्डव्दारे एक लाख रुपये काढून व कार्डव्दारे २ लाख ९९ हजार २०० रुपयांची खरेदी करून केली होती. याबाबत ४ लाख ११ हजार २०० रुपयांची चोरी झाल्याबाबत तक्रारदाराने बिबवेवाडी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली होती. त्यानुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा, फिर्यादींच्या बँक डिटेल्सवरून आरोपीने पुणे कॅम्प परिसरातून दोन महागडे मोबाइल खरेदी केल्याचे व एटीएम कार्डवरून बदरपूर हरियाणा येथे पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे समजले. आरोपी हा विमानाने गेल्याचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी पुण्याच्या लोहगाव विमानतळावर जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तिकीट बुकींगवरून संशयिताचे नाव व पत्ता ट्विंकल अरोरा असल्याचे व तो मूळचा हरियाणा येथील असल्याचे समजले. पोलिसांनी त्यास अटक केली. ही कारवाई पोनि (गुन्हे) अनिता हिवरकर, सपोनि प्रवीण काळुखे, अमंलदार श्यामराव लोहमकर, तानाजी सागर, संतोष जाधव, शिवाजी येवले व राहुल शेलार यांच्या पथकाने केली.

कर्जात बुडाला अन्...

पोलिसांनी अरोरा याला ताब्यात घेतल्यानंतर तो हरियाणातील एका नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत असल्याचे समोर आले. मात्र, तो क्रिकेट प्रेमी होता. त्याच क्रिकेट प्रेमाच्या वेडातून तो आयपीएल सामन्यावर बेटिंग खेळू लागला. याच बेटिंगमधून त्याला लाखो रुपयांचे कर्ज झाले अन त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला.

बातम्या आणखी आहेत...