आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज बारावीचा निकाल:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार, 14 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन स्वरूपात जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य बोर्डाकडून देण्यात आली आहे.

मंडळाच्या www.mahahscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाईल. संकेतस्थळावर गेल्यावर होम पेजवर इयत्ता १२ वी निकाल २०२२ ही लिंक पहावी. क्लिक केल्यावर नवे पेज उघडेल. तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मदिनांक टाकून सबमिट केल्यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. या वर्षी १४ लाख ८५,८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

बातम्या आणखी आहेत...