आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Twelve Km Of Underground Work Completed In 10 Months By TBM Of Pune Metro; Work That Started On 5 September 2021 From Swargate Ended On Saturday |marathi News

अखेर कामाचा शेवट:पुणे मेट्रोचे टीबीएमद्वारे 10 महिन्यांत बारा किमी भुयाराचे काम पूर्ण; 5 सप्टेंबर 2021 रोजी स्वारगेटपासून सुरू झालेले काम शनिवारी संपले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गाच्या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. टीबीएम मुळा-२ ने बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर ब्रेक थ्रू करण्यात शनिवारी यश मिळवले आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी स्वारगेटपासून सुरू झालेले खोदकाम मंडई स्थानक ओलांडून बुधवार पेठ येथे २.०२५ किमी बोगदा तयार करून अंदाजे १० महिन्यांत पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोने गाठलेला हा टप्पा म्हणजे एकूण १२ किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याचे संपूर्ण काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

मेट्रोचे काम अचूक : दीक्षित
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पुणे मेट्रोच्या बोगद्याचे काम अत्यंत अचूक आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने करण्यात आले. १२ किमीचा बोगदा मार्ग पूर्ण झाला असून महामेट्रोसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. नागरिक आणि प्रशासकीय संस्थांच्या पाठिंब्यामुळेच हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले.

बातम्या आणखी आहेत...