आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार दाखल:बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सराईत गुंडाचा पुण्यामध्ये बलात्कार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरी निघालेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला तोंड दाबून भररस्त्यातून घरी उचलून नेले. त्यानंतर गुंडाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख (२१, रा. जनता वसाहत, पुणे) याला अटक केली आहे. याबाबत मुलीच्या आईने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. १७ मार्च रोजी रात्री ही मुलगी घरी जात होती. यावेळी अस्लम शेख याने या मुलीचे तोंड दाबून तिला ओढत जबरदस्तीने आपल्या घरात नेले. घरातील बाथरुममध्ये तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...