आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:परदेशामध्ये अडकलेल्या नागरिकांवरून मंत्री आदित्य ठाकरे अन् आ. शिरोळेंमध्ये टि्वटर वॉर

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही वेळ टीका करण्याची नव्हे : आदित्य ठाकरेंचे उत्तर

पुण्यातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील ट्विटर वॉरही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे. परदेशात अडकलेल्या मराठी माणसांना मायदेशात परत आणणे हा मुद्दा त्यासाठी निमित्त झाला.

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी परराष्ट्र मंत्रालय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया यांनी तातडीने मदत करावी, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले. त्याला रिट्विट करताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत संवादाचा पूर्णपणे अभाव आहे का? सरकारच्या संथ आणि धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे राज्यातील एक हजार नागरिकांना मायदेशी येण्यासाठी ताटकळत परदेशातच राहावे लागत आहे. देवेंद्र फडणवीसांनी घेतली शिरोळेंची बाजू: मुंबईमध्ये विमानाच्या लँडिंगला राज्य सरकारने परवानगी न दिल्याने विविध देशांत अडकून पडलेले महाराष्ट्रातील नागरिक राज्यात येऊ शकत नाहीत. अन्य राज्य सरकारे मात्र त्यांच्या राज्यातील नागरिकांना परवानगी देत आहेत, असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ही वेळ टीका करण्याची नव्हे : आदित्य ठाकरेंचे उत्तर

शिरोळे यांच्या ट्विटला आदित्य ठाकरे यांनी परत ट्विट करून उत्तर दिले. ठाकरे यांनी त्यात म्हटले, तुम्ही नवीन आणि तरुण असल्याने इतर ट्रोल आर्मीपेक्षा वेगळे असाल असे वाटले होते. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात दोषारोप करण्यावर तुमचा भर नसेल असे वाटते. परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्या संपर्कात आम्ही आहोत. राजकारण करण्याची ही वेळ नाही, असे उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...