आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Two Arrested Along With The Rickshaw Puller, As Many As 59 Cases Have Been Registered Against The Accused In Various Police Stations.

रिक्षा पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक:संबंधित आरोपीविरुद्ध विविध ठाण्यातंर्गत तब्बल 59 गुन्हे दाखल

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारागृहातून सुटल्यानंतर सराईत गुन्हेगारने साथीदाराच्या मदतीने एका चालकाला दमदाटी करुन त्याची 50 हजार रुपये किमतीची रिक्षा बळजबरीने चोरुन नेली होती. मात्र, समर्थ पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने या घटनेचा तपास करुन आरोपींच्या अल्पावधीत मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून रिक्षा जप्त करण्यात आली आहे. फिरोज उर्फ बबाली मकबुल खान (वय 49, रा. कॅम्प चौक,पुणे) आणि इम्रान मेमन (वय 58,रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत. संबंधित आरोपीविरुद्ध विविध पोलिस ठाण्यातंर्गत तब्बल 59 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

याबाबत राजु डेव्हीड यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू डेविहिड हे रिक्षाचालक असून 10 मार्च रोजी निशांत टॉकीजजवळ प्रवाशाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी मोटार सायकलवर आलेल्या सराईत आरोपीसह साथीदाराने राजूला धमकावून त्याची रिक्षा बळजबरीने चोरुन नेली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने आरोपीचा माग काढण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान नागपुर कारागृहातून सुटलेल्या सराईताने रिक्षा चोरुन नेली असून, तो पुण्यातील पत्राचाळ परिसरात असल्याची माहिती पोलिस अंमलदार हेमंत पेरणे आणि कल्याण बोराडे यांना मिळाली होती.

सदर आरोपी मोबाइल वापरत नसल्यामुळे तांत्रिक विश्लेषणाची माहिती पथकाला मिळत नव्हती. मात्र, तरीही त्याचा पोलिसी पद्धतीने ठावठिकाणा शोधून सराईत फिरोज खान आणि इम्रान मेमन या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, एसीपी सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक, प्रमोद वाघमारे एपीआय प्रसाद लोणारे, हेमंत पेरणे, रहिम शेख, कल्याण बोराडे, दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, रोहीदास वाघीरे, अमोल शिंदे, श्याम सुर्यवंशी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...