आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वाढदिवसाला नाचायला येण्यास नकार दिल्याने दोन भावांना मारहाण

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचायला येण्यास नकार दिल्याने दोन भावांना दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना सुसगाव येथील पाखरे वस्तीमध्ये बुधवारी (22 जून) मध्यरात्री घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेश राम टेमकर (वय 20) आणि राहुल प्रकाश ढगे (वय 22, दोघेही रा. गणपती मंदिराच्या पाठीमागे, सुसगाव ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बसवराज अशोक हौशेट्टी (वय 21, रा. पाखरे वस्ती, सुस) यांनी बुधवारी (22 जून) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी हौशेट्टी हे गावातून पाणी घेऊन घरी चालले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपी आदेश टेमकर याने फिर्यादी यांना थांबवले.

लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण

मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचायला ये, असे त्याने फिर्यादी यांना सांगितले. मात्र हौशेट्टी यांनी त्यास नकार दिला. या कारणावरून संतापलेल्या आरोपीने शिवीगाळ करुन फिर्यादी यांना मारण्यासाठी दगड उचलला. त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ सिद्धाराम यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी आदेशने सिद्धाराम यांच्या डोक्‍यात दगड मारुन त्याला जखमी केले. आरोपी राहूल ढगे हा कारमधून खाली उतरला त्याने फिर्यादी याच्या डोक्‍यात दगड मारून जखमी केले. इतर आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर ते सर्व जण पळून गेले.

बातम्या आणखी आहेत...