आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसगांव:पुणे जिल्ह्यात धरणात बुडून बारावीच्या दोन मुलांचा मृत्यू

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यात पवन मावळातील कुसगांव येथील धरणात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विनय कडू (१७ वर्षे, रा. रावेत,पुणे) व आशिष गोगी (१७ वर्षे रा. सोमाटने,पुणे) अशी मृतांची नावे आहेत.

सध्या बारावीची परीक्षा सुरू असून मराठी विषया व्यतिरिक्त इतर सर्व विषयांचे पेपर झाले असून दरम्यानच्या काळात सुट्टी असल्याने पवन मावळातील कुसगांव येथील धरणात बारावीत शिकत असलेली सहा मुले फिरण्यासाठी आली होती. ही मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरली असता त्यातील आकुर्डी येथील महाळसाकांत महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत असलेला विनय कडू व आशिष गोगी या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या दोघांना बाहेर काढले.

बातम्या आणखी आहेत...