आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानृत्यांगना गौतमी पाटीलची सध्या राज्यात सध्या चांगलीच चर्चा आहे. गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रम म्हटल्यावर गर्दी होणार हे ठरलेलंच असतं. पंचक्रोशीत गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम असला की आसपासच्या गावातील प्रेक्षक कार्यक्रमासाठी गर्दी करणार हेही ठरलेलंच. अशातच गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी एका पट्ठयानं चक्क दोन दिवसांची सुटी मिळण्यासाठी अर्ज केल्याने आता यावर नवी चर्चा सुरू झाली आहे.
एसटी महामंडळात काम करणाऱ्या एका चालकानं गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी दोन दिवसांची सुटी हवी म्हणून आगार प्रमुखांकडे रजेचा अर्ज केला आहे. हा रजेचा अर्ज आता सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल अर्जानुसार अर्ज करणाऱ्या चालकाचे नाव प्रकाश रामचंद्र यमगर असे आहे. तासगाव आगारात हा चालक कार्यरत आहे. त्याने 22 मे आणि 23 मे असे दोन दिवसांसाठी रजेसाठी अर्ज केला आहे. यात रजेचे कारण म्हणून त्याने गौतमी पाटीलच्या गावात येणार आहे, म्हणून दोन दिवस रजा मिळावी अशी विनंती केली आहे.
पाहा व्हायरल अर्ज
थेट गौतमीचा नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी सुटी मागणाऱ्या या पट्ठ्याचा अर्ज आता सोशल मीडियातून व्हायरल होत असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.
गौतमी पाटीलविषयी या बातम्याही वाचा...
नाद करा पण आमचा कुठ:पठ्ठयाने बायकोच्या वाढदिवशी ठेवला गौतमी पाटीलचा डान्स शो, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात!
काही दिवसांपूर्वी वडिलांनी चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचे आयोजन केले होते. या वाढदिवसाची मोठी चर्चा झाली होती. आता एका पठ्ठयाने चक्क बायकोच्या वाढदिवसाला तरुणांच्या हृदयाची धडकन म्हटल्या जाणाऱ्या गौतमीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. (वाचा पूर्ण बातमी)
गावाची शान अन् जान असणाऱ्या 'बावऱ्या'साठी गौतमी पाटीलचा खास कार्यक्रम, बैलापुढे नाचली गौतमी
सबसे कातिल असे जिला म्हटले जाते त्या गौतमी पाटीलची संपूर्ण महाराष्ट्रात एकच हवा आहे. जिथे जिथे गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या त्या ठिकाणी गर्दीचा पूर वाहू लागतो. आत्तापर्यंत वाढदिवस, लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमात हजारोंच्या समोर गौतमीने आपली अदाकारी पेश केली. मात्र आता गौतमीच्या लावणीचा एक बैलही दिवाणा झाल्याचे पाहायला मिळाले. मुळशीत बावऱ्या बैलासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. (वाचा पूर्ण बातमी)
जाळ अन् धूर संगटच:गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, स्टेजवर येताच पब्लिक झाली बेफाम; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या पदन्यासाने मंत्रमुग्ध झालेले हजारोंचे पब्लिक. त्यातल्या निम्म्यांनी बसल्या जागी धरलेला ठेका. सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठी गर्दी पाहायला मिळते. आत्तापर्यंत तिचे अनेक कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या पंढरपूर येथील कार्यक्रमात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. (वाचा पूर्ण बातमी)
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा:गौतमीला पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकच गर्दी, प्रेक्षकांच्या अतिभारामुळे कोसळले शेड अन् 10 जण जखमी
वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे एका वाणिज्य दालनाच्या शुभारंभाला सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रेक्षक उभे असलेल्या पत्र्याचे शेड अतिभारामुळे कोसळून आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. (वाचा पूर्ण बातमी)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.