आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:फर्ग्युसनच्या मैदानावर खेळाडूंच्या दोन गटात मारामारी; डेक्कन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबाॅल सामन्या दरम्यान नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर खेळाडू मध्ये जोरदार मारामारीचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारहाण केल्या प्रकरणी 13 जणांच्या विरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

यासंदर्भात अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांच्यासह 13 जणांच्या विरुद्ध मारामारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वीरेंद्र महेंद्र परदेशी (वय -22, रा. सहकारनगर,पुणे) याने डेक्कन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यातील उपांत्यफेरी सुरु होती. त्यावेळी खेळताना चेंडूच्या ताब्यावरुन वाद झाला. त्यानंतर वीरेंद्र परदेशी याच्या संघातील खेळाडूंना प्रतिस्पर्धी गटातील खेकडूकडून शिवीगाळ करण्यात आली. प्रतिस्पर्धी संघातील 11 खेळाडू तसेच अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे परदेशी याने दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक एस कांबळे पुढील तपास करत आहेत.

पत्नीकडून पतीवर चाकुने वार

घरखर्चासाठी वारंवार मागणी करून ही पैसे न दिल्याने पत्नीने पतीवर चाकुने वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पत्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती रविवारी देण्यात आली आहे.

या घटेनत इम्रान खान (वय- 46, रा. शिवनेरीनगर, कोंढवा,पुणे) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी इम्रानची पत्नी नाझनीन हिच्या विरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रानचे वडील उस्मान (वय -71) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रमजान महिना सुरु असल्याने नाझनीनने इम्रानला घरखर्चासाठी पैसे मागितले होते. मात्र, इम्रानने पैसे देण्यास नकार दिल्याने नाझनीन आणि इम्रान यांच्यात जोरदार वाद झाला. रागाच्या भरात नाझनीने स्वयंपाकघरातील चाकुने इम्रान याच्यावर वार केले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .