आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी कामगार संघटनेच्या आंदोलनातील नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज (ता. 5) सलग दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका गुन्ह्यात चौकशी केली. चौकशीवेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सदावर्ते यांना बुधवारी (ता. 4) दुपारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास चौकशीसाठी बोलावले होते. सदावर्ते यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली.
इन कॅमेरा जबाब नोंदवला
पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा इन कॅमेरा जबाब नोंदविला आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. परंतु नेमकी चौकशी काय झाली हे मात्र स्पष्ट झाले नाही. त्यांच्या आवाजाचे नमुने फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
चौकशीनंतर माध्यमांशी न बोलताच गेले सदावर्ते
सदावर्ते यांची चौकशी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली. ठाण्यातून बाहेर पडताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
काय आहे प्रकरण
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना वकील सदावर्तेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणात 20 ऑक्टोबर 2022 ला भारती विद्यापीठ ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता या प्रकरणात सदावर्तेंची सलग दोन दिवस चौकशी झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.