आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक घटना:पूर्ववैमनस्यातून मध्यरात्री दोन सराईतांचा धारदार शस्त्राने खून

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्ववैमनस्यातून पुण्यात दुहेरी खुनाची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. येरवडा परिसरातील शंकर चव्हाण यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी ८ ते १० जणांच्या टोळक्याने अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर व सुभाष ऊर्फ किसन राठोड यांचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी सुभाषचा भाऊ लक्ष्मण राठोडने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. माहितीनुसार, मृत सुभाष राठोडने सन २००८-०९ च्या दरम्यान शंकर चव्हाण यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या होत्या. त्या गुन्ह्यात शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता.

बातम्या आणखी आहेत...