आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार उलटून झालेल्या अपघातात दाेघांचा मृत्यू

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवदर्शनासाठी जात असलेल्या पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून सासवड परिसरात अपघात घडला. या घटनेत कारमधील दाेन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. गाैरव लालवानी (१९, रायपूर, छत्तीसगड) आणि रचित मेहता (१८, मू.रा.कोलकाता) अशी या अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तीन विद्यार्थिनींसह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमी झालेले विद्यार्थी पुण्यातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सासवड परिसरातील नारायणपूर येथील दत्त महाराज मंदिरात देवदर्शनसाठी ते साेमवारी रात्री एक्सयूव्ही-३०० ने जात होते.

बातम्या आणखी आहेत...