आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या भीषण अपघातात गाडीचा चुरा झाला

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज(दि.25) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव इनोव्हा गाडीने पुढे जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार टक्कर दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा गाडीचा चुरा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचे समोरील टायर फुटल्याने भरधाव कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. ही घटना कामशेत बोगद्याजवळ घडली. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अभिजीत घवले (डेप्युटी कमिशनर जीएसटी माजगाव) आणि शंकर गोडा यतनाल यांचा समावेश आहे. तर, अपघातात वाहन चालक आणि अभिजीत घवले यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पावना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...