आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक-दोनचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी स्टाफसह लोणीकाळभोर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरच्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीसाठी आलेला असताना पकडलेले आहे.ओंरगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी ( वय -27, रा. पी ए इनामदार शाळे जवळ,प्लॉट न.110 मुकुंदनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पोलिस अंमलदार योगेश मांढरे व पोलिस शिपाई युवराज कांबळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित आरोपी ओंरगजेब पप्पू अन्सारी हा पांढरस्थळ गावाकडे जाणारे कच्चा रस्तावर सार्वजनिक रोडवर उरुळी कांचन,पुणे येथे अमली पदार्थ चरस विक्री करिता येत आहे.
त्यानुसार पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा घातला असता, त्या आरोपी परदेशी हा मिळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दोन किलो चरस जप्त केले आहे. बाजारभाव नुसार त्याची किंमत 24 लाख रुपये असून एक दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल ही पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण हे करीत आहेत.तसेच सदर आरोपी हा येरवडा पोलिस स्टेशन येथील एका अमली पदार्थ गुन्ह्यात देखील पाहिजे आरोपी आहे.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे ,सहा पोलिस आयुक्त् नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके ,पो हवा संतोष देशपांडे ,संदीप जाधव, योगेश मांढरे,युवराज कांबळे,संदीप शेळके,अझीम शेख,रवी रोकडे, चेतन गायकवाड साहिल शेख, दिनेश् बास्टेवाड यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.