आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरासह ग्रामीण भागातून आणि पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातून नागरिकांचे मोबाइल हिसकावणाऱ्या सराईत दोन अल्पवयीन संशयित आरोपींना युनीट पाचने अटक केली आहे. त्यांचा एका साथीदाराला अटक केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी (29 जुलै) दिली.
अडीच लाखांचा मुद्देमाल
आरोपींकडून 2 लाख 53 हजारांचे 10 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. चोरट्यांनी हडपसर,लोणी काळभोर,येरवडा, यवत, दिघी, परिसरात मोबाइल हिसकावल्याचे उघडकीस आले आहे. ऋषिकेश संजय देडे (वय 21 ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या दोन सराईत अल्पवयीन साथीदारांना ही ताब्यात घेतले आहे.
पोलिसांची कामगिरी
दुचाकीस्वार चोरट्यांकडून मोबाइल हिसकावण्याच्या पार्श्वभूमिवर गुन्हे शाखेचे युनीट पाचचे पथक 28 जुलैला हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अमंलदार प्रमोद टिळेकर यांना दोघेजण दुचाकीवर फिरून मोबाइल हिसकावून चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ऋषिकेश देडे आणि दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत दोघा सराईत अल्पवयींनासह तिघांनी विविध ठिकाणांहून मोबाइल चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगांवकर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय कृष्णा बाबर, उपनिरीक्षक चैताली गपाट, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, रमेश साबळे, दया शेगर, अमित कांबळे, राहुल ढमढेरे, किशोर पोटे स्वाती गावडे यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.