आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:वैयक्तीक वादातून गडचिरोलीत पोलिसांचा एकमेकांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू, पोलिस दलात खळबळ

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथून बंदोबस्तासाठी गडचीरोलीत गेलेल्या पोलिसांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली आहे. या घटनेत दोन पोलिस जागीच ठार झाले. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

श्रीकांत बेरड, बंडू नवथरे अशी मयतांची नावे आहेत. सदर दोघेही दौंड पुणे येथील एसआरपी कॅम्पचे जवान आहेत. काही दिवसांपूर्वी ते इतर पोलिस पथकासोबत गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी गेले होते. त्यावेळी अचानक दोघात किरकोळ कारणातून वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसेत होऊन राज्य राखीव पोलिस दलाच्या दोनही जवानांनी एकमेकांवर गोळीबार केला.

पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे तैनातीस हे दोन्ही जवान कार्यरत होते. या घटनेत दोघेही मृत पावल्याची माहिती आहे. श्रीकांत बेरड, बंडू नवथरे अशी मयतांची नावे आहे. दोघेही दौंड पुणे येथील एसआरपी कॅम्पचे जवान होते. याबाबतची माहिती मिळताच, वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...