आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Two wheeler Insurance Taken Out In The Name Of Car Insurance, Two Agents Arrested; Agents Had Shown 2 Thousand 286 Two Wheeler Cars

कारच्या विम्याच्या नावाने काढला दुचाकीचा विमा:दोघांना अटक; 2 हजार 286 दुचाकी दाखविल्या होत्या मोटारी

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोटारींसह इतर मोठ्या वाहनांच्या इन्शुरन्सच्या नावाखाली पैसे घेऊन थेट वाहनांचा संवर्ग बदलत आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीसह वाहनमालकांची फसवणूक करणाऱ्या दोघा एजंटांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत घडली.

अनंत राघू कचरे (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा,पुणे) आणि अजित अशोक सावंत (वय 29 रा. भाकरेवाडी, सोलापूर, सध्या रा. काळभोरनगर, पिंपरी-चिंचवड,पुणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी स्वानंद जगदीश पंडित (वय 41, रा. बंडगार्डन,पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपींनी ऑनलाइनरीत्या वाहन प्रकारात बदल करीत तीनचाकी, चारचाकी वाहने दुचाकी असल्याचे भासवून फसवणूक केली. अशाप्रकारे तब्बल 2 हजार 286 मोठ्या वाहनांना दुचाकी वाहने दाखवून आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीला कोट्यवधींचा गंडा घातला आहे. त्याशिवाय वाहन मालकांसह शासनाला कर न भरता फसवणूक केली आहे. फिर्यादी स्वानंद पंडित हे बंडगार्डन परिसरातील ढोले-पाटील रस्त्यावर असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीत तपासणी अधिकारी आहेत. त्यांच्याकडे प्राप्त विमा पॉलिसी तपासताना त्यांनी एका दुचाकीचा क्रमांक पडताळून पाहिला. त्यावेळी संबंधित क्रमांक टेम्पोच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे उघडकीस आले.

इन्शुरन्स कंपनीने शासनाच्या वाहन पोर्टलवरून माहिती काढली असता, एजंटांनी अशाच पद्धतीने 2 हजार 286 मोठ्या वाहनांना दुचाकी असल्याचे भासवून विमा काढल्याचे उघडकीस आले. त्यासाठी आरोपींनी मोटार मालकांकडून त्या पटीत रक्कम घेऊन दुचाकींचा विमा काढल्याचे निष्पन्न झाले. नागरिकांकडून मोटारींसह इतर चारचाकी वाहनांचा इन्शुरन्स काढण्याची रक्कम घेत चक्क वाहनांचा संवर्ग बदलून दुचाकी असल्याचे भासवित फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी दोघा एजंटांना अटक केली असून आणखी तपास सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...