आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे शाखेने केली अटक:अग्निपथ भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणारे दोघे गजाआड

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्कराच्या अग्निपथ भरती योजनेत सहभागी होण्यासाठी बनावट रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांवर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोपट विठ्ठल आलंदार (३८) आणि सुरेश पितांबर खरात (३१, दोघेही रा. सोलापूर) अशीआरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, रोकड तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

लष्करातील नोकर भरतीसाठी सध्या मुंबईत अग्निपथ भरती सुरू आहे. त्यात जीडी आणि टेक्निकल अशा दोन पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील रहिवासी अर्ज करू शकतात. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही उमेदवारांनी एका संस्थेत संपर्क साधला. आरोपींकडून बनावट रहिवासी दाखला दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

४० उमेदवारांना दिली प्रमाणपत्रे अटक केलेल्या आराेपींकडे बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले आढळले आहेत. त्यांनी तब्बल ४० उमेदवारांना बनावट रहिवासी प्रमाणपत्रे तयार करून दिल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आली. पुढील तपास गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...