आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात दोन युवकांचा अपघाती मृत्यू:ट्रकच्या धडकेने मालवाहू गाडीचालक युवकाचा मृत्यू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोंढवा आणि पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या.

कोंढव्यातील खडीमशीन चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. ओंकार गौतम वाघमारे (वय 19, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सुमीत म्हस्के (वय 20, रा. बिबवेवाडी) जखमी झाला. म्हस्के याने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार म्हस्के आणि त्याचा मित्र वाघमारे कोंढवा-कात्रज रस्त्यावरील खडीमशीन चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात सहप्रवासी वाघमारेचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी दिनेश रासकर तपास करत आहेत. दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावर उरूळी कांचन परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेने मालवाहू गाडीचालक युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अविनाश शिवाजी बागाडे (वय 19, रा. माकर वस्ती, सहजपूर, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. शिवाजी बागडे (वय 48) यांनी याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश बगाडे आणि त्याचे दोन मित्र हिंजवडीत माल घेऊन गेले होते. तेथून मालवाहू गाडीतून ते सहजपूरकडे निघाले होते. उरुळी कांचन परिसरात पहाटे तीनच्या सुमारास ते थांबले. मालवाहू गाडी रस्त्याच्या कडेला लावली. मालवाहू गाडीचा दरवाजा उघडून अविनाश प्रवेश करत होता. त्या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने गाडीला धडक दिली. अपघातात अविनाशचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून पोलस उपनिरीक्षक घायगुडे तपास करत आहेत.

सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती संस्थेच्या आवरातील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत बालचित्रवाणी संस्थेतील प्रभारी विधी अधिकारी रवींद्र माने (वय 53, धायरी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सेनापती बापट रस्ता परिसरातील बालभारती (बालचित्रवाणी) संस्थेच्या आवारात चोरटे पहाटे शिरले. चोरट्यांनी आवरातील तीन चंदनाची झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकर तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...