आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय:पुण्यात उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार, 5 जणांविरोधात गुन्हा; 4 तरुणींची सुटका

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील साळुंके विहार परिसरात एका स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली असून वेश्याव्यवसायातून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

आरोपींचा शोध सुरू

स्पा मॅनेजर झारणा ऊर्फ पिंकी मंडल (वय २७, रा.पश्चिम बंगाल), मॅनेजर सुमित होनखंडे (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्पा मालक रचना साळुंखे ( रा. येवलेवाडी, पुणे), सार्थक गिरमे (रा.वानवडी, पुणे) व लोचन गीरमे (रा.पुणे) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

उच्चभ्रू सोसायटीत मसाज सेंटर

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळुंखे विहार या उच्चभ्रु परिसरात ‘गोल्डन टच स्पा’ नावाचे मसाज सेंटर आहे. या मसाज सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने माहितीची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवून माहिती घेतली. त्यावेळी पीडित तरुणींकडून मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा रक्कम घेऊन वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानुसार पोलीसांनी स्पा सेंटरवर कारवाई करुन दोन मॅनेजरसह स्पा मालक, स्पा सहकारी यांच्यावर पिटा कायद्यानुसार वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक छत्तीसगड, एक पश्चिम बंगाल व दोन महाराष्ट्रातील आहे.

कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, पीएसआय सुप्रिया पंढरकर, पोहवा नीलम शिंदे, राजश्री मोहिते, अजय राणे, पोना इरफान पठाण, हणमंत कांबळे, सुरेंद्र साबळे, पोशि साईनाथ पाटील, अमित जमदाडे यांचे पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...