आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Udayan Raje Bose, A Descendant Of Chhatrapati Shivaji Maharaj, Said That The Uddhav Government Should Be Ashamed, His Stance Is Doubtful.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उदयनराजेंची संतप्त भूमिका:मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडीवर संतापले उदयनराजे भोसले, म्हणाले - राज्य सरकार गंभीर नाही, आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका संशयास्पद

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाने काही काळासाठी या प्रकरणाची सुनावणी टाळली आहे. यावर महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे.

मराठा आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आता चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारचा वकील अनुपस्थित असल्यामुळे कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती. यावरुन आता राज्य सरकारवर टीकास्त्र साधले जात आहे. भाजपचे राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हे महाविकास आघाडी सरकारवर संतापले आहे.

मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका संशयास्पद
बुधवारी उदयनराजे भोसले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाद्वारे मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदा सुनावणी होणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्यामुळे सुयानावणी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली. यावरुन सरकार मराठा आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सरकार आणि वकिलांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे यावरुन सिद्ध होते. यामुळे मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका संशयास्पद आहे अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केली.

मराठा समजाचा संयम सुटताना दिसतोय
भोसले म्हणाले की, 'मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन चार आठवडे झाले आहे, तरीही सरकार सुस्त आहे. आरक्षणावरील निकाल आला नसल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनची समस्या आहे. शेकडो तरुणांतच्या नोकरीचा मुद्दा पेंडिंगमध्ये आहे. तरीही सरकारला जाग आलेली नाही.'

पुढे उदयनराजे म्हणाले की, 'मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका काय आहे? सरकारनी हे तात्काळ स्पष्ट करावे. मराठा समाजाच्या संयमाचा बांध सुटत आहे. सरकार मराठा बांधवांचा संयम तुटण्याची वाट पाहत आहे का? जर सरकारने मराठा आरक्षणाविषयी ठोस पाऊले उचललली नाही तर मराठा समाज शांत बसणार नाही.' असा इशारा उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

'महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे'
उदयनराजे म्हणाले की, 'यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची घोषणा केली होती. मात्र असे वाटतेय की, मराठा आरक्षणाविषयी सरकारने कोणतीही दिशा ठरवलेली नाही. कारण सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची बाजू मांडणारे सरकारी वकील उपस्थित नव्हते. यामुळे कोर्टाने काही काळासाठी या प्रकरणाची सुनावणी टाळली आहे. यावर महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे. आता सरकारने तात्काळ ठोस पाऊले उचलली नाहीत तर मराठा समाज सरकारला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही.'

'दिड महिन्यापासून सरकार झोपले होते का'
उदयनराजे पुढे म्हणाले की, 'सरकारला वाटते की, मराठा आरक्षणावरील सुनावणी संविधान पीठाने करावी तर दिड महिन्यापूर्वीच मागणी का करण्यात आली नाही? दिड महिन्याचा वेळ वाया का घातला?'